स्वास्थ्य बीमा योजनेचा राज्यात ‘उपचार’ बंद

August 2, 2014 6:45 PM0 commentsViews: 1070

rashtriya swasthya bima yojana02 ऑगस्ट : यूपीए सरकारच्या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना महाराष्ट्र सरकारनं बंद केली आहे. ही योजना इतर राज्यात सुरू असताना महाराष्ट्रात मात्र बंद करण्यात आली आहे.

2008 ते 2013 या काळात योजनेवर सरकारने 231 कोटी रुपये खर्च केले होते. ताप, पोटदुखी यांसारख्या मूलभूत आजारांवर उपचारासाठी ही योजना होती.

इतर योजनांतर्गत हे आजार बरे होत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय. पण हा दावा फसवा आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गरिबांना यापासून वंचित राहावं लागणार आहे.

का बंद केली राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना?

– केंद्रातल्या यूपीए सरकारने 2008 साली सुरू केली होती योजना
– ताप, पोटदुखी यांसारखे साधे आजार तपासणं आणि उपचार करणं, हा हेतू
– असंघटीत क्षेत्रातील कामगार, दारिद्र्यरेषेखालील नागरिक हे लाभार्थी
– खासगी हॉस्पिटल्सशी संलग्न सेवा; प्रत्येक लाभार्थीला 30 हजार रुपयांचा लाभ
– 6 वर्षांत विमा कंपन्यांच्या हप्त्यासाठी सरकारने दिले रु. 231 कोटी
– 2013 साली राज्य सरकारनं अचानक बंद केली योजना
– राजीव गांधी जीवनदायी योजना दिल्याचा राज्य सरकारचा दावा
– पण जीवनदायी योजनेमध्ये होतात फक्त सुपरस्पेशालिटी आजारांवर उपचार
– आम आदमी विमा योजना आणि वैद्यकीय अपघात विमा योजना हे पर्याय म्हणून सुरू केल्याचा सरकारचा दावा
– पण या दोन्ही नव्या योजनांमध्ये हॉस्पिटल्समध्ये उपचार दिले जात नाहीत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close