मेडल्सची लयलूट

August 3, 2014 11:39 AM0 commentsViews: 386

0
03 ऑगस्ट :  कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला स्क्वॅशमध्ये गोल्ड मेडल मिळालंय. स्क्वॅशमध्ये भारताला मिळालेल हे पहिलंच गोल्ड मेडल आहे. जोश्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लीकलने डबल्समध्ये हे गोल्ड मेडल जिंकलं आहे. फायनलमध्ये दीपिका आणि जोश्ना यांनी इंग्लंडच्या जेनी डनकाल्फ आणि लौरा मासारो यांचा सरळ दोन सेटमध्ये 11-6, 11-8 गुणांनी मात करत आपल्या देशाला कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्क्वॅशमधलं पहिले गोल्ड मेडल जिंकून दिलं. दरम्यान, भारताच्या पी व्ही सिंधूला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. तिने बॅडमिंटन एकेरीत पदक मिळवलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close