नॅनो कारनंतर आता नॅनो हाऊसिंगची घोषणा

May 6, 2009 12:53 PM0 commentsViews: 3

6 मेनॅनो कारनंतर आता टाटा समूहाने नॅनो हाऊसिंगची घोषणा केली आहे. शुभ गृह नावाचा हा प्रकल्प मुंबईतल्या बोईसरजवळ असेल. या स्मार्ट व्हॅल्यू होम्सची किंमत 3.9 लाख ते 6.7 लाख रुपयांपर्यंत असेल. यातील एक रुम किचन 283 आणि 360 स्क्वेअर फुट तर 1 बीएचकेचं घर 465 स्क्वेअर फुटांचं असेल. मुंबईनंतर भारतभर अशाप्रकारच्या प्रकल्पांना सुरुवात करण्यात येणार आहे. तसंच नॅनो कार प्रमाणेच या घरांची नोंदणीही एसबीआयमध्ये करता येणार आहे अशी माहिती या प्रकल्पाबाबत टाटा हाऊसिंगचे एमडी आणि सीईओ ब्रॉटिन बॅनर्जी यांनी दिली आहे.

close