विधानसभेतसाठी नवा फॉर्म्युला तयार होणार – देवेंद्र फडणवीस

August 3, 2014 8:22 PM0 commentsViews: 2832

03 ऑगस्ट :  महायुतीत जागावाटपाचा नवा फॉर्म्युला तयार होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. गेल्या वेळचा 119-169चा फॉर्म्युला येत्या विधानसभा निवडणुकीत लागू होणार नाही, तर यावेळी जागांची फेरमांडणी करावीच लागेल, अशी माहिती फडणवीस यांनी आयबाएन लोकमतच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिली.

महायुतीतल्या जागावाटपासंबंधी प्राथमिक फेरीवरच्या बैठका सध्या सुरू आहेत. पहिल्याच बैठकीत भाजपनं गेल्यावेळीपेक्षा 15 जागा वाढवून मागितल्या होत्या. पण, शिवसेनेनं त्याला ठाम नकार दिला होता. त्याशिवाय यावेळी आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठीही जागा सोडाव्या लागणार आहे. आरपीआयनं 20 जागांची, राष्ट्रीय समाज पक्षानं 20 जागांची तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 35 जागांची मागणी केली आहे. हा तिढा महायुती कसा सोडवते, हे पहावं लागणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close