सुहास खामकरला 50 हजारांची लाच घेताना अटक

August 4, 2014 7:10 PM0 commentsViews: 12905

suhash_khamkar04 ऑगस्ट : ‘भारत श्री’ किताब पटकावणारा शरीरसौष्ठपटू सुहास खामकर यांना 50 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. पनवेल लाचलुचपत विभागाने ही कारवाई केलीय.

भारत श्री किताबासह शरीरसौष्ठ स्पर्धेत भरीव कामगिरीची दखल घेऊन राज्य सरकारने सुहास खामकरची पनवेलमध्ये नायब तहसिलदारपदी नियुक्ती केली होती.

मात्र आज सातबारावर नोंद करण्यासाठी खामकर यांनी 50 हजारांची लाच मागितली. 50 हजारांची ही लाच घेताना खामकर यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close