राणेंच्या नाराजीनाट्याचा आज शेवटचा अंक ?

August 5, 2014 8:55 AM0 commentsViews: 3870

56rane_pc05 ऑगस्ट : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी ‘कोकण वादळ’ असं नाव देऊन उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण राजीनामा देऊन 15 दिवस झाले आहेत. पण काँग्रेसकडून अद्याप कुठलंही ठोस आश्वासन त्यांना देण्यात आलेलं नाही. राणेंचं मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून काँग्रेसचे राज्यप्रभारी मोहन प्रकाश आज रात्री राणेंची भेट घेणार होते पण ही भेट टळलीय. त्यामुळे राणे उद्या राणे आपली जाहीर करण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांनी पक्षावर आणि मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत राजीनामा देऊ केला. कोकण वादळाचा पहिला आठवडा राणेंनी चांगलाच गाजवला. एवढंच नाहीतर दिल्लीवारी करून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचं आश्वासन देऊन राणेंचा निरोप घेतला. पण राणेंची सोनियांशी काही भेट झाली नाही.

15 दिवस उलटले तरी काँग्रेसचा कोणताही नेता राणेंच्या राजीनाम्यावर बोलायला तयार नसल्यामुळे राणे पक्षातच एकटे पडले. पण तरीही राणेंनी प्रदेशाध्यक्षपद आणि महसूलमंत्रिपद द्यावं असा प्रस्ताव हायकंमांडकडे ठेवलाय, अशी माहिती आहे. दरम्यान, काँग्रेसकडून थंड प्रतिसाद मिळतोय हे लक्षात येताच राणेंनी मंगळवारी आपली भूमिका जाहीर करण्याचे संकेत दिले होते. राणेंचं मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून काँग्रेसचे राज्यप्रभारी मोहन प्रकाश आज रात्री राणेंची भेट घेणार होते पण ही भेट टळलीय.

मोहन प्रकाश यांच्या पायाला फॅक्चर झाल्यानं ही भेट टळली. नानावटी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे काल रविवारी कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे राजीनामा नाट्यानंतर प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी मराठा आरक्षण समितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकमतानं आपल्या नावाला मंजुरी दिली असं सांगत राणे यांनी दोघांचेही आभार मानले. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अहवाल तयार करण्यासाठी राणेंनी केलेल्या परिश्रमाचं कौतुक केलं. नारायण राणेंनी अगोदर आक्रमक भूमिका घेत आता नरमाईची भूमिका घेतलीये. पण संयम कुठपर्यंत राखायचा असा प्रश्न राणेंना पडलाय त्यामुळे राणे उद्या मंगळवारी काय भूमिका घेता की अजून पक्षाच्या निर्णयाची वाट पाहता हे पाहावे लागेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close