माळीण दुर्घटनेत मृतांचा आकडा 151 वर

August 5, 2014 6:44 PM0 commentsViews: 3503

1augest_malin_pune (5)

05 ऑगस्ट :पुण्याजवळ माळीण गाव दुर्घटनेत मृतांचा आकडा आता 151 वर गेला आहे. बचावकार्याचा आज सातवा दिवस आहे. माळीण गाव परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने सकाळी बचावकार्यात अडथळा येत होता. सोमवारी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे बचावकार्याचा वेगही वाढला होता. पावसाबरोबरच इथे चिखल आणि दुर्गंधीचाही सामना एनडीआरएफच्या जवानांना करावा लागतोय. ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढतोय. मागच्या आठवड्यात बुधवारी डोंगरकडा कोसळल्यामुळे माळीण गावातील 44 घरं गाडली गेली. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच प्रत्येक कुटुंबाचे पुनर्वसन केलं जाणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close