मुळशी धरण ओव्हरफ्लो, सांगवीत 100 कुटुंबांचं स्थलांतर

August 5, 2014 9:08 AM0 commentsViews: 2923

mulshi_dam05 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल मुळशी धरण पूर्ण भरलंय. मात्र या धरणक्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ होतेय. मुळशी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे मुळशी धरणातून 35 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं होतं. यामुळे पिंपरी चिंचवड परिसरात नदीकाठचा अनेक भागांमध्ये पाणी शिरलंय.

या पुरामुळे सांगवी परिसरात 50 हून जास्त झोपड्या पाण्याखाली गेल्या आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे 100 कुटुंबांनी स्थलांतर केलंय. मुळशी धरणातलं अतिरिक्त पाणी मुळा नदीच्या पात्रात सोडलं जातंय. त्यामुळे मुळा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तर पिंपरी चिंचवड परिसरातून मुळा नदी वाहत असल्यानं या नदीकाठी राहणार्‍या 40 हून जास्त कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. जोपर्यंत नदी पात्रातील पाण्याचा जोर ओसरत नाही तोवर या सर्व स्थलांतरित कुटुंबांना त्यांच्या झोपड्यांपासून दूर असलेल्या सुरक्षित ठिकाणीच ठेवणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी दिलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close