वरुणराजे रूसले, नगरवर बरसलेच नाही !

August 5, 2014 12:35 PM1 commentViews: 1322

drought_in_maharashtra05 ऑगस्ट : राज्यभर जोरदार पावसाचा धडाका सुरू आहे. मुंबईसह कोकण, विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावलीय. पण अहमदनगर जिल्हा मात्र अजूनही कोरडाच आहे. विशेष म्हणजे पारनेर, पाथर्डी, कर्जत आणि जामनेर या तालुक्यांमध्ये अजून एक थेंबही पाऊस पडलेला नाही.

गावांमध्ये पंप आहेत, पाईपलाईन आहेत, तलावही आहेत. नाहीये ते फक्त पाणी. पेरण्यांचं तर नावही नाही. जनावरांना दूर, माणसांनाही पिण्यासाठी पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय.

गेली 3 वर्ष इथली तीव्र पाणी टंचाई कायम आहे. मागच्या वर्षी पंचनामे झाले ते कागदावरच राहिले आणि घोषणा झाल्या त्या हवेत विरून गेल्या. विशेष म्हणजे, राज्याचे महसूल आणि कृषी दोन्ही मंत्री याच जिल्ह्यातले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत पाऊस

 • कर्जत – 0 मिमी
 • जामखेड – 3 मिमी
 • पाथर्डी – 0 मिमी
 • पारनेर – 2 मिमी
 • नगर – 4 मिमी
 • श्रीगोंदा – 7 मिमी
 • शेवगाव – 0 मिमी
 • राहाता – 5 मिमी
 • नेवासा – 0 मिमी
 • राहुरी – 3 मिमी
 • श्रीरामपूर – 5 मिमी
 • संगमनेर – 4 मिमी
 • अकोले – 41 मिमी

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Kanse Patil

  sarkari dhorene karnipht
  ahe

close