‘टीव्ही शो’साठी ‘त्या’ मॉडेलचा हा सगळा खटाटोप ?

August 5, 2014 1:40 PM2 commentsViews: 6287

sunil_paraskar_case 05 ऑगस्ट : मुंबईचे वरिष्ठ पोलीस आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्याविरोधात एका मॉडेलनं केलेल्या आरोप प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. या मॉडेलचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी खटल्यातून माघार घेतली आहे. पारसकरांनी या मॉडेलवर कधीच बलात्कार केला नव्हता, असं या वकिलांनी सांगितलंय.

तिला एका टीव्ही शोमध्ये सहभाग घ्यायचा होता, त्यासाठी तिला वाद निर्माण करायचा होता असं सिद्दीकींनी सांगितलंय. त्यासाठी पारसकरांना बदनाम करण्याच्या दृष्टीने एखादा वाद निर्माण करायला तिनं आपल्याला सांगितलं होतं, असं सिद्दीकी यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, मुंबई कोर्टात या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या तरुणीने पारसकर यांच्यावर विनयभंग आणि बलात्काराचा आरोप केलाय. या प्रकरणी पारसकर यांच्याविरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर 376(2) , 376 (क) आणि 354 (ड) या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही सर्व कलम गंभीर स्वरुपाची आहे.

मध्यंतरी या प्रकरणी शिवसेनेनं पारसकर यांची पाठराखण केली होती. पारसकरांच्या बाबतीत पोलिसांनी संबुरीने घ्यावं असा सल्ला सेनेनं दिला होता. तसंच सहा महिन्यापुर्वी बलात्कार झाला होता तर तेव्हा का तक्रार केली नाही असा सवालही सेनेनं उपस्थित केला होता.

याबद्दल या मॉडेलचं काय म्हणणं आहे ?

“मी ऍडव्होकेट रिझवान सिद्दिकी यांना ओळखते, मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पारसकरांना नोटीस पाठवली. नंतर मला समजलं की हा वकीलच पारसकरांच्या प्रभावाखाली आहे. त्यांचा एक कॉमन मित्र होता. वकिलाशी झालेल्या संभाषणातून ही बाब स्पष्ट झाली. माझ्याकडे या मेसेज आणि फोनकॉल्सचे तपशील आहेत.”
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sachin Nalawade

    Do not make head lines of what others say, what the person who has complained is saying more important.

  • rahulil.com

    Big Boss sathi publicity havi aahe?

close