दिल्लीत घरं खाली झाली, आता मुंबईत होऊ देऊ नका’

August 5, 2014 1:31 PM1 commentViews: 2254

vilas_mutemvar_on cm05 ऑगस्ट : दिल्लीतलं सरकार गेलं, आता राज्यातलं सांभाळा असा घरचा अहेर देत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर त्यांच्या उपस्थितीत चांगलचे चिमटे काढले. विदर्भ विभागीय काँग्रेस मेळाव्यात  विलास मुत्तेमवार यांनी तुफान टोलेबाजी केली. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे आपला कसा पराभव झाला याचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोरच वाचला.

आता दिल्लीत आपलं काही राहिलं नाही, जे पराभूत झाले त्या खासदारांना घरं खाली करावी लागत आहे. आता हेच मुंबईत होऊ देऊ नका असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार हे बरं झाला आता फक्त मुख्यमंत्री आणि माणिकराव ठाकरे म्हणजे ‘हम दो हमारे दो’ अस म्हणतात सभागृहात एकच हशा पिकली. इतकंच नाही, तर नितीन राऊत अनिस अहमद आणि सतीश चतुर्वेदी यांनी मदत न केल्याचा आरोप केलाय.

आम्ही तर हरलो पण विधानसभेत आता तुमच्या तरी जागा वाचवा असा टोला मुत्तेमवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. तसंच माझ्यावर सार्वजनिक जीवनात एक आरोपही झाला नाही पण गडकरींना आरोपांचा डोंगर आहे. आम आदमीच्या नेत्या अंजली दमानियांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. काँग्रेसवरही असेच आरोप झाले पण झालं काय भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गडकरी जनतेनं निवडून दिलं अशी सलही त्यांनी व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • rahulil.com

    tu gap re bhadkhau.. kam kela nahi mhanun harlas tu,… bhrashtachar kamat hoto.. tu tar ti ved yeuch dili nahi.. paise direct ghari utaravle.. aani sand jhala

close