राष्ट्रवादी 144 जागांवर ठाम – अजित पवार

August 5, 2014 4:55 PM2 commentsViews: 1736

23ajit_pawar

05 ऑगस्ट :  विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. 144 जागा द्या नाहीतर स्वबळावर लढा असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. काँग्रेसनेही जशाच तसे उत्तर देत एक जागाही वाढून भेटणार नाही असं स्पष्ट भूमिका घेतली.

आज परभणीमध्ये अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी 144 जागांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेत काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. तेव्हा विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाढवून मिळाव्या, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. काँग्रेसला जागावाटपाचा निर्णय मान्य नसेल तर स्वबळावर लढू, असं अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीने 144 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला असला तरी काँग्रेसने मात्र राष्ट्रवादीला 125 जागा देण्याची तयारी दाखवली आहे. जागा वाढवून देणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • VIJAY MOHARIR

  NCP intends to break the alliance with Congress so that NCP after election can take fresh position , by making alliance with any other party-BJP, SENA, MANASE, CONGRESS,- to remain again in power by any means. Powar and people surrounded around him can not leave without power.

 • ramesh

  आदिवासी समाजातील एखाद्या व्यक्तीने जर अपराध केला तर त्याची ब्रेकिंग न्यूज बनवून समस्त आदिवासी बांधवांना बदनाम केले जाते.

  पण आज समस्त आदिवासी बांधव अत्यंत शिस्तिने आपले आन्दोलन करत आहे याची न्यूज मात्र कुठे मीडियात दिसत नाही.

  व्वा रे मीडिया

  लोकशाहीचा चौथा स्तंभ

  विकला की काय?

close