नितीशकुमारांचा भाव वधारला : पासवान आणि लालू नाराज

May 8, 2009 9:47 AM0 commentsViews: 1

8 मे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधीं यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची स्तुती केल्यामुळे लोकजनशक्ती पार्टीचे नेते राम विलास पासवान आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव अजूनही नाराज आहेत.पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घरी आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. परंतु या बैठकीला रामविलास पसावान आणि लालूप्रसाद यादव जाणार नसल्याचं सांगण्यात येतंय. तरीही पासवान यांनी मात्र आपण नाराज नसल्याचं जरा नाराजीच्याच सुरात सांगितलं आहे. तसंच पासवान कोलकात्यामध्ये सभा घेणार असल्याचंही समजतंय.

close