अमेरिकेतल्या वर्षा कलवारनं दिलं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं प्रशिक्षण

August 7, 2014 10:15 AM0 commentsViews: 235

07 ऑगस्ट :  सुट्टीचा उत्तम वापर कसा करावा यांचं उत्तम उदाहरण अमेरिकेत शिकणार्‍या वर्षा कलवार या मुलीनं घालून दिलंय. आपल्या सुट्टीच्या काळात पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागातल्या आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी झटून त्यांना लॅपटॉप मिळवून देऊन प्रशिक्षणही दिलं. विक्रमगडमधल्या आश्रमशाळांमधले हे दहावीचे विद्यार्थी सध्या गुंगून गेलेत ते लॅपटॉप शिकण्यात. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात आश्रमशाळेतील मुलांना वर्षानं गेले दहा दिवस लॅपटॉपचं प्रशिक्षण दिलं.

कॉम्प्युटरचं दर्शनही दुर्लभ असलेल्या या मुलांना लॅपटॉप स्वत:ला वापरायला मिळणं ही पर्वणीच होती. रिअल ही अमेरिकन संस्था आणि डॉ.एम.एल. ढवळे मेमोरिअल ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून वर्षानं हे प्रशिक्षण सुरू केलं. अमेरिकेत शिकणार्‍या वर्षाला तळागाळातल्या मुलांसाठी काम करण्याची इच्छा चैन पडू देईना. त्यातूनच तिनं इंटेल या संस्थेला पत्र लिहून त्यांच्याकडून दहा कॉम्प्युटर्स मिळवले. त्यात आवश्यक ती सॉफ्टवेअर घालून आणि ते दहा लॅपटॉप ती भारतात घेऊन आली. या आश्रमशाळेतल्या मुलांना प्रशिक्षण दिलं. तिचं प्रशिक्षण जरी दहा दिवसांपुरतंच असलं तरी भारतातल्या ढवळे ट्रस्टतर्फे हा उपक्रम आता पुढे नेला जाणार असून परिसरातल्या इतरही आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना या लॅपटॉपचा लाभ मिळेल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close