दिल्लीच्या रस्त्यावर भरदिवसा तरुणाची हत्या

August 7, 2014 11:07 AM2 commentsViews: 4985

delhi murder CCTV footage

07 ऑगस्ट :  देशाच्या राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर काल दिवसाढवळ्या एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली. 19 वर्षांच्या या तरुणाला सहा जणांच्या गटाने दिवसाढवळ्या चाकूने वारंवार भोसकलं. हा तरुण आपल्या मित्रासोबत घरी परतत होता. त्याला वाटेत अडवून या टोळक्याने त्याच्यावर वार केले. ही भयानक दृष्यं सीसीटीव्ही कॅमेर्‍यातही कैद झाली आहेत.

दिल्लीतल्या गजबजलेल्या रस्त्यावर भरदिवसा काही मुलांनी समोरुन येणार्‍या बाईक चालकावर हल्ला करून त्याला खाली पाडलं. बाईकवर मागे बसलेला तरुण तिथून कसाबसा पळ काढण्यात यशस्वी ठरला पण या हल्लेखोरांनी बाईक चालवणार्‍या तरुणाची मात्र हत्या केली. हे सगळं घडत असताना आजूबाजूच्या लोकांनी मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतली. या लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यसाठी या हल्लेखोरांनी हवेत गोळीबार ही केला. या हल्लेखोरांपैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 3 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

दिल्लीत दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळं पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vikram sawant

    shame on

  • sachin narale

    phile srvana fasavr ltkva

close