सलामाननंतर आता आमिरनेही व्यक्त केली मराठीत काम करण्याची इच्छा

August 7, 2014 11:12 AM0 commentsViews: 1422

aamirkhan(1)

07  ऑगस्ट :  बॉलिवूडचे बडे अभिनेते आता मराठीकडे आपली पावलं वळवताना दिसत आहेत. अक्षय कुमार, रितेश देशमुख, सलामान खानने याआधीच मराठी चित्रपाटात दमदारा एन्ट्री केली आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आमिरनंही मराठीत फिल्म बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्यासाठी तो एका चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत आहे.

मुंबईत मकरंद देशपांडे दिग्दर्शित ‘सॅटर्डे-सन्डे’या फिल्मचा प्रिमियर शो नुकताच पार पडला. आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी आमिर आवर्जून उपस्थित राहिला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्याने मराठी फिल्म बनवण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मला मराठी फिल्म करायची आहे. एखादी चांगली स्क्रीप्ट मिळाली तर मराठीत नक्की काम करेन, त्यामुळे माझी मराठी ही सुधारेल, असं तो म्हणाला. विशेष म्हणजे यावेळी त्याने मराठीत उत्तरं द्यायचाही प्रयत्न केला.

‘पीके’च्या पोस्टरवरून सध्या चांगलाच चर्चेत असणारा आमिर आता मराठीत यायचं म्हणतोय म्हणजे मराठी इंडस्ट्रीला अच्छे दिन आलेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close