विमा विधेयकाच्या तिढ्यावर तडजोड करण्याची शक्यता

August 7, 2014 1:27 PM0 commentsViews: 1036

insurance

07 ऑगस्ट :   विमा विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकार विरोधकांच्या दबावापुढे काहीशी माघार घेण्याची शक्यता आहे. CNN-IBNला मिळालेल्या माहितीनुसार, विमा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा सरकार विचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार आहेत. हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात यावं अशी विरोधकांची मागणी आहे. विशेष म्हणजे काल या मुद्द्यावर बोलावलेली सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close