सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचं निधन

August 7, 2014 2:34 PM0 commentsViews: 976

Eknath Thakur

07 ऑगस्ट :  सारस्वत बँकेचे अध्यक्ष, नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगचे संस्थापक आणि शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचं निधन झालं, ते 73 वर्षांचे होते. ठाकूर गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज सकाळी मुंबईच्या प्रभादेवीतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. उद्या 11 ते 4 पर्यंत प्रभादेवीच्या सारस्वत बँकेत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सारस्वत बँकेच्या अध्यक्षपदी एकनाथ ठाकूर यांनी 39 वर्षांतला (1973 ते 2012) एक कार्यात्मक झंझावात म्हणून ठाकूर विख्यात आहेत. बँक अधिकार्‍यांचे संघटन घडवून आणणारे सर्वाेत्तम संघटक, विचारशील नेतृत्व म्हणून त्यांचे कार्य हा एक आदर्श आहे. त्यांचे विविध क्षेत्रांना कवेत घेणारे कामगार संघटन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावले आहे. त्यांनी निर्माण केलेली नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग ही प्रशिक्षण देणारी संस्था त्या क्षेत्रातील एक आदर्श मॉडेल आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close