मुंबई हायकोर्टानं फेटाळला मनोहर कदम यांचा जामीन अर्ज

May 8, 2009 12:33 PM0 commentsViews: 5

8 मे, मुंबई घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगर गोळीबारप्रकरणातले दोषी मनोहर कदम यांचा जामिनासाठीचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळा आहे. दोषी मनोहर कदम यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. रमाबाई आंबेडकरनगर गोळीबार प्रकरणी काल मनोहर कदम यांना शीवडी फास्टट्रॅक कोर्टानं जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगरात 11 जुलै 1997 रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांना काल दोषी ठरवण्यात आलं. तब्बल 12 वर्षांनी मनोहर कदम यांना कलम 304 (अ) नुसार दोषी ठरवण्यात येऊन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या सुनावणीचा निकाल गेली काही आठवडे लांबणीवर पडत होता. पण 12 वर्षांनी काल लागलेल्या या निकालामुळे रामाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरणातल्या शहिदांना न्याय मिळाल्याची चर्चा सुरू आहे.

close