कार्यकर्त्यांनी वाढवली भुजबळांची डोकेदुखी

August 7, 2014 5:32 PM0 commentsViews: 4240

bhujbal07 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. यासाठी भुजबळ लोकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे कार्यकर्ते मात्र मागच्या वेळप्रमाणेच त्यांना अडचणीत आणत आहेत.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी दादागिरी करत आर्कीटेक्टचर कॉलेजमध्ये तोडफोड केलीए. या कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी केलाय. मात्र, कॉलेजमध्ये असा कोणताही रॅगिंगचा प्रकार घडला नसल्याचं कॉलेज व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. तरीही त्यांचं म्हणणं ऐकून न घेता खैरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजची तोडफोड केली. दिलीप खैरे हे भुजबळांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. रॅगिंगच्या तक्रारीची चौकशी सुरू असताना, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या दंडेलशाहीचा कॉलेजच्या मॅनेजमेंटनं निषेध केलाय. सातपूर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजुने तक्रारी दाखल झाल्या आहेत. भुजबळ सध्या येवल्यातच ठाण मांडून आहेत. येवलेकरांना विचारताहेत, तुम्हीच सांगा मी काय करू ? नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत, त्यापैकी दोन पदं भुजबळांच्या घरातच आहेत. त्यामुळे यावेळीही येवल्याची लढत आणि हा मतदारसंघ लक्षवेधी ठरणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close