लाचखोर सुहास खामकरला जामीन

August 7, 2014 7:43 PM1 commentViews: 3087

suhash_khamkar07 ऑगस्ट : ‘भारत श्री’ किताब पटकावणारा शरीरसौष्ठपटू सुहास खामकर लाचखोरीमुळे वादात सापडला. 50 हजारांची लाच घेताना सुहासला अटक करण्यात आली होती त्याला आज (गुरुवारी) जामीन मिळालाय. अलिबाग सत्र न्यायालयाने 25 हजारांच्या जामिनावर खामकरची सुटका केलीय.

लाच प्रकरणी मंगळवारी अलिबाग सत्र न्यायालयात सुहासला हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. भारत श्री किताबासह शरीरसौष्ठ स्पर्धेत भरीव कामगिरीची दखल घेऊन राज्य सरकारने सुहास खामकरची पनवेलमध्ये नायब तहसिलदारपदी नियुक्ती केली.

मात्र पनवेलमध्ये एका जमिनीच्या सातबारावर नोंदणी करण्यासाठी सुहास खामकरने 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 50 हजार रुपये देण्याचे तक्रारदारांनी मान्य केले होते. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर रायगडच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि खामकरला रंगेहाथ पकडलं होतं. आता या प्रकरणी सुहासला जामीन मिळालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jayesh Shertate`

    yane pan naav kharab kel marathi manasach…. you was inspiration of youth.

close