‘चला, उठा महाराष्ट्र घडवूया’, सेनेचं ‘व्हिजन’ डॉक्युमेंट सादर

August 7, 2014 8:38 PM6 commentsViews: 5133

sena vision07 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. लोकसभेत दमदार यश मिळवल्यानंतर शिवसेनेनं विधानसभेसाठी आता कंबर कसली आहे. मनसेच्या ‘बहुचर्चित’ ब्लू प्रिंटच्या अगोदर बाजी मारत सेनेनं आज (गुरुवारी) ‘व्हिजन डॉक्युमेंट’ सादर केली आहे. ‘चला, उठा महाराष्ट्र घडवूया’, या संकल्पनेखाली व्हिजन डॉक्युमेंट बनवण्यात आलंय.

मुंबई पहिला मान देत योजनाचा आराखडा तयार करण्यात आलाय. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणार अशी घोषणा उद्धव यांनी केली. तसंच गेल्या वर्षभरापासून रखडलेलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारणार असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, ग्रामीण, मागासवर्गियांसाठी वाढीव तरतूद असं निवडणुकीचं जोरदार पॅकेज यात आखण्यात आलंय. आज संध्याकाळी मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केली.

विशेष म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे यांनी 12 जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक जिल्ह्यातल्या पदाधिकार्‍यांशी उद्धव यांनी एकाच वेळी संवाद साधला. यासाठी अगोदरच शिवसेनेनं 12 जिल्ह्यात व्हिडिओ कॉन्फरन्स सेंटर स्थापन केलं आहे. आता या डॉक्युमेंटवर महायुतीतल्या इतर घटक पक्षांच्यांही सूचना मागवणार आहे आणि त्यानंतर सर्वांचा विचार घेऊन वचननामा तयार करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.

कसं आहे शिवसेनेचं व्हिजन डॉक्युमेंट ?

मुंबईसाठी योजना

 • - पूर्व किनार्‍यावर कोस्टल रोड
 • - रेसकोर्सच्या जागी उद्यान
 • - मेट्रो रेल्वेचे विस्तारीकरण
 • - र्व्हच्युअल क्लासरूम ही संकल्पना राज्यभर राबवणार
 • - मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणार
 • - मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक करणार
 • - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार

ग्रामीण महाराष्ट्रासाठी योजना

 • - ग्रामीण महाराष्ट्राचा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विकास
 • - उद्योगांना महाराष्ट्रातच थांबवणार
 • - सेझचा शेतकर्‍यांच्या हितासाठी वापर
 • - नागरिकांसाठी सुविधा केंद्र
 • - बेरोजगारांसाठी झुणका भाकरच्या धर्तीवर नवी योजना
 • - कोरडवाहू शेतीसाठी वेगळं धोरण
 • - किमान 12 तास कृषीपंपांना अखंड वीजपुरवठा
 • - नुकसानभरपाईसाठीचा अन्यायकारक आणेवारी कायदा बदलणार
 • - माती परीक्षण प्रयोगशाळा

 शिक्षण

 • - शिक्षणाचा दर्जा सुधारणार
 • - शिक्षण हक्क कायद्याचा तंतोतंत अंमलबजावणी
 • - प्रत्येक शाळेत विद्यार्थी
 • - विद्यार्थिनीसाठी स्वच्छतागृहं

आरोग्य

 • - आरोग्य विम्याची मर्यादा 2 लाखांपर्यंत
 • - अर्भक मृत्यूदर घटवणार
 • - स्त्रीभ्रूणहत्या टाळणार
 • - ग्रामीण भागात साप्ताहिक आरोग्य शिबीर
 • - नागपूरमध्ये अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल

 
मागासवर्गियांसाठी वाढीव आर्थिक तरतूद

 • - महिला सक्षमीकरणावर भर देणार
 • - शिवरायांच्या जीवनावर आधारित संग्रालय आणि शो
 • - संत विद्यापीठाची स्थापना
 • - पंजाबमधल्या घुमानमध्ये नामदेवांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा

 
इतर

 • - अमरावतीला ऍग्रिकल्चरल हब करणार
 • - नागपूरला ट्रान्सपोर्ट हब करणार
 • - पुण्याला एज्युकेशनल हब करणार
 • - सोलापूरला टेक्स्टाईल हब करणार

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • amit

  What is new.. that not promise by any other government?

 • akhtar

  ya agodar mumbai chya rastya che khadde bujhun dakhwa !!

 • uday Marbate

  fewu……………… pahile election jinka….

 • Dnyaneshwar

  Marathwadya sathi kahi ahe ki
  nahi…??????

 • ajinath n. gadekar

  are salyanno maharastrat maratwadyat kahi karta ka ? tumacha sarva chambu-gabal marathwadyachya bharwsyawar ahe jara vichar kara.nahi tar tumhala war yeu denar nahi salyanno… sambhalun vichar kara ejjatit sangtoy…

 • RAJENDRA BHISE

  ARE KHADDE KAI SHIV SENANE KELYE AHET KA ANI BMC CHA 70% KARBHAR HA MAHRASTAR GOV BHGAT ASTE YALA JIMEDAR MMRD METRO TASECH NAVIN CHALNARE KAME AHE ANI TI SARV KAME MAHRASTRA GOV JIMEDAR AHET TYANA KAHI KON BOLAT NAHI

close