अजब चोरीची गजब गोष्ट सीसीटीव्हीत कैद

August 7, 2014 11:11 PM0 commentsViews: 4951

07 ऑगस्ट : चोर कशी चोरी करतील याचा नेम नाही पण आता चोरांनी एक अजब फंडा वापरालाय. चोरांनी आता चक्क राजकीय पुढार्‍यांचे नातेवाईक असल्याचे सांगून लुटीचे प्रकार चालवले आहेत. अशीच एक घटना विरार मध्ये घडली आहे.

विरार मधील राजकीय प्रस्थ असणारे हितेंद्र ठाकूर यांचा मेव्हणा असल्याचे सांगून एका व्यक्तीला लुटल्याची घटना घडलीय. विरार पूर्वेला राहणारे राजेंद्र नाईक या भुरट्या चोरांचे शिकार बनले.

नाईक सकाळी आपल्या पार्किंगमधून कार काढण्यासाठी जात असताना एक अज्ञात इसम आला आणि त्यांना आपली जबरदस्ती नाईक यांना ओळख करून दिली आपण विरारचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचा मेव्हणा असल्याचे सांगून या चोरट्यांनी नाईक यांच्या खिश्यातले सर्व पैसे, गळ्यातील चैन हातातील अंगठी असा 40,000 हजाराचा ऐवज लुटून नेला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close