हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईफेक

August 8, 2014 12:58 PM0 commentsViews: 6486

h patil 408 ऑगस्ट : आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या धनगर समाजाचे आंदोलन आता आणखी चिघळले. इंदापूर तालुक्यातील
भिलवणमध्ये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकलीय.

भिलवणमध्ये हर्षवर्धन पाटील एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी चार कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांवर शाईफेक केली. शाई डोळ्यात गेल्यामुळे पाटील यांच्या डोळ्यांना त्रास होतोय. हर्षवर्धन पाटील उपचारासाठी बारामतीमधील काते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

पण कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे धनगर समाजाचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहे. तर दुसरीकडे ही बातमी पसरताच काँग्रेसचेही कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. कार्यकर्त्यांनी भिगवण गाव बंदची घोषणा केली. भिगवणमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. घटनास्थळी एसआरपीएफची तुकड्या दाखल झाल्या असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

शाईच्या बाटलीत केमिकल असण्याचा अंदाज

अशा घटना घडत असतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांतता राखावी कुणी कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केलंय. आयबीएन लोकमतला पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. भिगवणमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरुन खाली उतरलो तेव्हा चार ते पाच तरुणांनी अचानक येऊन शाई फेकली. शाई डाव्या डोळ्यात गेल्यामुळे इजा झालीय. इंदापूरमध्ये प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे असं पाटील यांनी सांगितलं.

तसंच जेव्हा ही घटना घडली तेव्हा पोलीस ही हजर होते त्यांच्याही अंगावर शाई पडली. शाई पडल्यानंतर पोलिसांच्या कपड्याला छेद पडले. शाईमध्ये दुसरं काही केमिकल असावं असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकरणी कारवाई करण्याचा अधिकार हा पोलिसांचा आहे पोलीस योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close