भाजपचे माजी नेते जसवंत सिंह कोमामध्ये

August 8, 2014 1:11 PM0 commentsViews: 1510

news_jaswant singh_bjp08 ऑगस्ट : भाजपचे माजी नेते जसवंत सिंग यांची प्रकृती चिंताजनक आहे ते कोमामध्ये आहेत. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलंय.

गुरुवारी संध्याकाळी घरामध्ये घसरून पडल्याने 76 वर्षांच्या जसवंत सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लगेचच दिल्लीच्या आर्मी रिसर्च ऍण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रीया करण्यात आली आणि सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून धोका टळलेला नाही असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंह यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या कुटुंबियांशी फोनवर बातचित केली. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी थोड्याच वेळापूर्वी हॉस्पिटलला भेट दिली. भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही सकाळीच हॉस्पिटलमध्ये जाऊन जसवंत सिंहांच्या प्रकृतीची चौकशी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close