राजस्थान रॉयलनं पाडला बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा खुर्दा

May 8, 2009 3:53 PM0 commentsViews: 4

8 मेबंगलोर रॉयल चॅलेंजर्सवर विजय मिळवत राजस्थान रॉयलनं पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. बंगलोरनं दिलेल्या 106 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना राजस्थाननं तब्बल 7 विकेट राखून बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा खुर्दा पाडला.राजस्थान विरुद्ध बंगलोरच्या मॅचमध्ये जगातले दोन सर्वोत्तम लेग स्पिनर्स टॉससाठी एकमेकांसमोर उभे होते. दोघेही क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे यानिमित्ताने जुन्या काळातली वर्चस्वाची लढाई मैदानावर बघायला मिळाली. वॉर्ननं टॉस जिंकला आणि पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अचूकही ठरला. आणि बंगलोरचे बॅट्समन एकामागोमाग झटपट आऊट झाले. त्यामुळे बंगलोरची दयनीय अवस्था झाली होती. विराट कोहलीनं बंगलोरचा स्कोर वाढवण्याचा आणि मोठी इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला खरा पण तो रविंद्र जाडेजाने त्याची तिसरी विकेट घेतल्यामुळे त्याचा खेळ तिथेच थांबला. या मॅचमध्ये वॉर्नचे सगळे डावपेच अगदी अचूक चालत होते. त्याला ठोकलेल्या या सिक्समुळे बंगलोरचा स्कोर जरी 100 च्या वर गेला असला तरीही बंगलोरनं राजस्थानपुढे विजयासाठी फक्त 106 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.नमन ओझाच्या तुफान बॅटिंगनं आणि युसुफ पठाणच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं 5 ओव्हर्स शिल्लक ठेवत रॉयल चॅलेंजर्सवर तब्बल 7 विकेट राखून रॉयल विजय मिळवला.

close