लोकलमध्ये गुंडागर्दी, प्रवाशाला जबर मारहाण

August 8, 2014 2:02 PM1 commentViews: 3990

08 ऑगस्ट : मुंबईच्या लोकलमध्ये जागेसाठी आडवाआडवी नेहमीचीच पण आमच्या जागेवर बसला म्हणून एका प्रवाशाला गुंडागर्दीला सामोरं जावं लागलं. प्रवाशांच्या एका ग्रुपने एकट्या प्रवाशाला जबर मारहाण केली. हा सगळा प्रकार एका महिलेनं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला त्यामुळे हा सगळा राडा उजेडात आला.

गुरुवारी संध्याकाळी चारच्या सुमारास बोरीवलीहून डहाणूकडे लोकल रवाना झाली होती. बोरीवली स्टेशनवर नेहमीचा एक ग्रुप लोकलच्या सेकंडच्या डब्यात चढला. पण आपल्या नेहमीच्या जागेवर दुसराच व्यक्ती बसल्याचं पाहून ग्रुपचे लोकं खवळले. विरार किंवा भाईंदर लोकलमध्ये न चढता डहाणू लोकलमध्ये का चढला असा सवाल करत या व्यक्तीला जागेवरुन उठवलं.

ग्रुपची दादागिरी पाहुन तो व्यक्ती निमुटपणे जागेवरुन उठला आणि बाजूला होत असतांना त्याचा धक्का ग्रुपच्या सदस्याला लागला त्यामुळे या ग्रुपच्या लोकांनी धक्का लागल्याचं निमित्तपुढं करुन जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार सुरू असताना डब्यातील इतर प्रवाशी मात्र बघ्याची भूमिका निभावत होते. एका महिलेनं धाडस करुन हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या व्हिडिओच्या आधारे रेल्वे पोलिसांनी अशा ग्रुपवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असून अधिक तपास करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Anup Khodwe

    this is because lack of education….all are great people

close