‘मावळ प्रकरणातील वारसांनी एका नेत्यामुळे मदत नाकारली’

August 8, 2014 7:16 PM1 commentViews: 2833

nasik_ajit_pawar08 ऑगस्ट : मावळ गोळीबार प्रकरणातील मृतांच्या वारसांना सरकारने देऊ केलेली नोकरी आणि आर्थिक मदत नाकारली आहे. एका स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ही मदत नाकारली असा खळबजनक दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. मदत देण्यात आली होती पण मृतांच्या वारसांचा हा दोष असल्याचंही पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

ऑगस्ट 2011 मध्ये मावळमध्ये पवना पाईपलाईनच्या प्रश्नावरून शेतकर्‍यांनी आंदोलन झालं होतं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता.

राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली होती. पण अजित पवारांनी केलेल्या दावामुळे नवाच खुलासा समोर आलाय.

आम्ही नोकरी आणि आर्थिक मदत देऊ केली होती मात्र स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरुन त्यांनी ती मदत नाकारली, आणि हा दोष त्यांचा आहे असं पवार म्हणाले. यामुळे मावळ गोळीबार प्रकरणातल्या पीडितांना न्याय मिळण्याची आशा धूसर झालीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Khandusing Pardeshi

    Maval Prakaran kevha ? Ajit Dada Bolta kevha ?

close