‘इबोला’व्हायरस पसरतोय, सावधानतेचा इशारा

August 8, 2014 10:57 PM0 commentsViews: 23902

eblo08 ऑगस्ट : जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(डब्लूएचओ)ने पश्चिम आफ्रिकेत ‘इबोला व्हायरस’ची साथ आली आहे असं जाहीर केलंय.

रोगाचा सामना करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये ही साथ पसरतेय त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाने त्यांची मदत करावी, असं आवाहन डब्लूएचओनं केलंय. इबोलाची साथ मार्च महिन्यात गिनीमध्ये सुरू झाली.त्यानंतर सिएरा लिऑन आणि लायबेरियामध्ये ही साथ पसरली.

या रोगासाठी कुठलंही औषध किंवा लस नाही आणि या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 50 टक्के आहे. भारतात इबोलाची भीती नाही, भारतात हा रोग देशात पसरू नये, यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

इबोला काय आहे?

 • – जनावरांमार्फत माणसांना इबोलाचा संसर्ग होतो
 • – जनावरांचं रक्त, मांस, मलमूत्र इ.चा माणसाशी संपर्क आला तर इबोलाच्या संसर्गाची शक्यता वाढते
 • – तसंच ज्या व्यक्तीचा इबोलानं मृत्यू झालाय त्याच्या रक्ताशी संपर्क आल्यास इबोलाचा संसर्ग होतो

लक्षणं

 • – ताप, नाका-तोंडातून रक्त येणं
 • – लगेचच स्कीन इन्फेक्शन होणं, अंगावर पुरळ येणं
 • – डोळे येणं, तोंड येणं
 • – जननेंदि्रयांवर सूज येणं

काय काळजी घ्यावी?

 • – प्राथमिक स्वच्छता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे
 • – विशेष करुन मांसाहारी लोकांनी स्वच्छता बाळगणं आवश्यक आहे
 • – हात स्वच्छ धुवावेत, स्वच्छ ठिकाणांहून मांस खरेदी करावं
 • – मांस नीट शिजवावं
 • – दुखापत झालेल्या प्राण्यांचं मांस खाऊ नये
 • – स्वच्छ पाणी प्यावं

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close