नेटवर्कच्या जाळ्यात नातीगोती…

August 8, 2014 11:06 PM6 commentsViews: 6246

pranli talavanekar ibn lokmatप्रणाली तळवणेकर, सीनिअर प्रोड्युसर, IBN लोकमत

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका वर्तमानपत्राच्या आर्टिकलमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, सोशल वेबसाईटचा आणि वॉट्सअपचा वापर हा मानवाच्या जीवनशैलीवर कळत नकळत दुष्परिणाम करतोय. या नेटवर्किंगच्या वापरामुळे माणसं एकमेकांपासून दुरावतात आणि संवादाचा अतिरिक्त वापर केल्यामुळे नाती तुटतात. पण काही व्यक्तींना जणू याचं व्यसनच जडलंय. त्यामुळे होतंय काय की नैराश्येचं प्रमाण वाढलंय.

आपल्या मॅसेजेस्‌ला किंवा स्टेटसला लगेचच किंवा उशिरा दिलेला प्रतिसाद, चांगल्या किंवा वाईट कमेंट्समुळे कळत नकळत का होईना, माणसाच्या ‘सो कॉल्ड’ संवेदनशील मनावर विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे व्हॉट्सऍप तात्काळ डिलीट करा. याच लेखाच्या अधीन होऊन माझ्या एका संवेदनशील मनाच्या मित्राने व्हॉट्सअप डिलीट केलं आणि इतरांनाही तो लेख शेअर करत ताबडतोब आपल्या आयुष्यातून व्हॉट्सअपला हद्दपार करा असा मोलाचा सल्लाही दिला. या डिलिशनच्या कृतीमुळे मी माझ्या आयुष्यात किती सुखी झालोय याची पोचपावतीही त्याने सगळ्यांपर्यंत पोहोचवली, तीही एका दुसर्‍या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनच. या लेखाची हेडलाईनच तशीच होती. व्हॉट्सअपचा दुष्परिणाम.

whts upम्हणूनच की काय, माझ्या त्या संवेदनशील मित्राने याचा क्विक इम्पॅक्ट स्वत:वर करून घेत लगेच व्हॉट्सअपच्या होळीमध्ये स्वत:ला स्वाहा करून घेतले. पण जरा का आपण आपल्या मेंदूला आणि मनाला चालना दिली आणि आपणच आपल्या ‘सो कॉल्ड’ संवेदनशील मनाला प्रश्न विचारला की दुष्परिणाम का? चांगला परिणाम का नाही?

जर या प्रश्नाचा सकारात्मक मागोवा घेतला तर उत्तर नक्कीच मिळेल आणि तेही पॉझिटिव्ह. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या चौथीतल्या मैत्रिणीने फेसबुकवरून माझा शोध घेत मला रिक्वेस्ट पाठवली आणि बर्‍याच वर्षांनंतर आमच्यातला मैत्रीचा प्रवास पुन्हा सुरू झाला. हे तुमच्या बाबतीतही बर्‍याचदा घडले असेल, बरं का?

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेला एक किस्सा. “फेसबुकवर शाळेतील या मित्र-मैत्रिणींनी एकमेकांचा शोध काढत एक ग्रुप बनवला. बघता बघता ग्रुपचे अनेक मेंबर झाले. त्यानंतर त्यांनी गेट टूगेदरही केलं आणि विशेष म्हणजे गेट टूगेदरच्या वेळी त्यांनी आपल्या शाळेतील जुन्या शिक्षकांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला. एवढंच नाहीतर त्यांनी गरजू मुलांना शैक्षणिक मदतीचा उपक्रमही सुरू केला.”

आता याला काय म्हणावे अधोगती की उन्नती? आज फेसबुकवर, व्हॉट्सअपवर इतर सोशल वेबसाईटच्या माध्यमातून सोशल अव्हरअरनेस तयार होतो. महिलांना, बालकांना, वृद्धांना आणि विशेषत: तरुणाईला चांगले संदेश दिले जातात. सोशल मीडियाचा आताच्या घडीला क्रांतीसाठी वापर जास्त केला जातोय हे विसरून चालणार नाही. या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह नाही का?

social mediaफक्त एखाद्‌दुसर्‍या व्यक्तीमुळे किंवा ग्रुपमुळे आपण या वेबसाईट किंवा ऍपचा वापर सोडून समाजापासून दूर का जावं बरं… काही तज्ज्ञ व्यक्तींच्या मते सोशल ऍप्सचा किंवा वेबसाईटचा वापर हा आपल्या ज्ञानार्जनाकरिता क्विक माहितीकरिता आणि व्यक्तींना व्यक्तीशी जोडण्याकरिता केला तर आजच्या धावपळीच्या युगात हा नेटचा भाग एक ‘मास्टर की’ ठरू शकते, जी तुम्हाला कमी वेळात करेक्ट इन्फॉर्मेशन आणि करेक्ट व्यक्तींशी जोडण्याचा डेटा उपलब्ध करेल.

यासाठी काय करायचं बरं… असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. करेक्ट… तुमच्या मनातही हाच विचार घोळतोय. याचं उत्तरही आहे. आपण फक्त एवढंच करायचं की, ठराविक वेळ निश्चित करायची किंवा आपल्या रुटीन लाईफमधून काही ठराविक क्षण या गोष्टींकरिता राखून ठेवायचे. जेणेकरून तुम्ही अगदी कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधू शकता. हा…पण मोजकाच वेळ बरं का…? कारण त्यानंतरचा वेळ हा तुमच्या दैनंदिन कामकाजासाठी, तुमच्या आसपास वावरणार्‍या व्यक्तींसाठी आणि तुमच्या खास पार्टनरसाठीही डेडिकेट करायचा. तरच आपल्या सेन्सिटिव्ह मनाला या गोष्टींच्या आहारी जाऊ न देता तुम्ही आयुष्यात फरफेक्ट बॅलन्स साधू शकता. ज्यामुळे तुमचं आयुष्य सुखकर काय तर वेल इन्फोर्मेटिव्ह आणि वेल कनेक्टिव्ह पण होईल.

34social mediaएकूणच काय, तर नेटला आपल्या आयुष्यात किती आणि केवढं स्थान द्यायचं आणि आपल्या सेन्सिटिव्ह हृदयाचा बचाव कसा करायचा हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. तज्ज्ञांच्या मते जीवनात आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी किंवा या ज्ञानार्जनाच्या गोष्टींचा वापर योग्य तो करून, त्यांचा आपल्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा किंवा त्यांच्या आहारी कितपत जायचं याचा मेन कंट्रोल जर का आपण आपल्या सजग मेंदूकडे ठेवला तर कुठलीही गोष्ट सहज शक्य होऊ शकेल. म्हणून मित्रांनो, तुम्हीच ठरवा की सोशल नेटवर्किंगचा शाप म्हणून दु:स्वास करायचा की वरदान म्हणून त्याचा योग्य तो वापर करून फरफेक्ट गोल अचिव्ह करायचा आणि जीवनाचा आनंद लुटायचा. SO CHEER FRIENDS… STAY COOL AND STAY CONECTED…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • w.Bhushan

  Agdi kharay !!

 • SATISH

  hoy ashi EAKDAM best batami ani vichar mala khoop avadale dhanyavad dear MS PRANALI

 • shailesh

  social sites aani whats’up mhanje aaj vyasan zhalay jyacha sharirapekha manavar parinam hot aahe aani yamule bhartat khup matha vaicharik matbhed nirman honar aahe.

 • Jitendra Mandhare

  aasha khup kahi goshti ahet pratyek goshtila changli aani waait aashya 2 baaju aastat aapan kitpat aani kuth paryant samil vayche he aapan tharawayche aaste. nadit budun manse martat mhanun kahi aapan nadya bujawat nahi, jyala pohata yete tyanech jawal jawe , anyatha lambunch pahane bare.

 • ganesh parekar

  Ptatek goshtila 2 side astat negitave &positives. But aaply var depend aahe aapan ksae ghayche .po ya ne ……

 • sonali bandre

  pratek goshtila kiti vel dyava te tharvun rahile tar konthyahi vait goshtinchi lagan hot nahi..
  i agree with you jitendra

close