नागपूरच्या तीन शाळकरी मुलांची ग्लोबल भरारी

May 8, 2009 4:26 PM0 commentsViews: 3

8 मे, नागपूर कल्पना नळसकरअंतराळातल्या कायम लोकवस्तीची संकल्पना मांडणारं मॉडेल नागपूरच्या निकालस सोमलवार शाळेच्या शंतनू मानके, जय पात्रीकर, मधुर भालकर या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मॉडेलला नासाचं पहिलं बक्षीस जाहीर झालंय. त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे जगभरातल्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी नासानं या विद्याथ्यांर्ना आमंत्रित केलं आहे नासाच्या या स्पर्धेत जगभरातून 808 विद्यार्थ्यांचे 294 प्रबंध नासाकडे आले होते. मात्र त्यामध्ये नागपूरच्या सोमलवारच्या या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हा प्रबंध तयार करण्यासाठी त्यांना त्यांच्या शिक्षकांनीही मदत केली. या विद्यार्थ्यांच्या ई-नेक्स्ट या प्रबंधाची ही नासानं विशेष दखल घेतली आहे. येत्या 28 ते 31 मे दरम्यान जगभरातील शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याठी अमेरिकेतील टोरनॅडो शहरात नासानं या विद्याथ्यांर्ना आमंत्रित केलं आहे.

close