पुण्यातल्या दोन भावांची आंतरराष्ट्रीय आईस स्केटींग स्पर्धेसाठी निवड

May 8, 2009 4:32 PM0 commentsViews: 2

8 मे, पुणे भारतात आईस स्केटींग खेळ हा तसा फारसा लोकप्रीय नाही. पण पुण्यातल्या सुमीत आणि सुयोग तापकीर या दोन मुलांनी उपलब्ध सोयींमधुन या खेळाची तयारी केली .आणि त्यांच्या या प्रयत्नांचं फळ त्यांना मिळालं. मलेशीयाला होणार्‍या आंतरराष्ट्रीय आईस स्केटींग स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.सध्या त्यांचा दिवस सुरु होतो पहाटे चार वाजता. रोज सकाळी साडेचारपासून ते स्केटींगची प्रॅक्टीस करतात. कारण मलेशीयाला होणार्‍या आंतरराष्ट्रीय आईस स्केटींग स्पर्धेत त्यांना जिंकायचंय. त्यासाठी ही प्रॅक्टीसच त्यांना महत्वाची ठरणार आहे. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. कारण पुण्यात आईस स्केटींगचा ट्रॅक नसल्यामुळे प्रॅक्टीससाठी त्यांना मुंबई गाठावी लागायची. पण त्यांचे कोच बोध पाटील यांच्या जिद्दीमुळे हे शक्य झालं आहे. ही आंतरराष्ट्रीय आईस स्केटींग स्पर्धा मलेशीयाची असली तरी खरं स्वप्न आहे ते ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचं आणि त्यासाठीच हे दोन्ही भाऊ प्रयत्न करत आहेत.

close