अनिल अंबानी यांची टियान यॉट वादाच्या भोव-यात

May 8, 2009 5:30 PM0 commentsViews: 10

8 मे, मुंबई अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपने (एडीएजी) यॉटवर लागू असलेली करोडो रूपयांची कस्टम ड्युटी आणि बँक गॅरंटीची रक्कम न चुकवल्याबद्दल मुंबई कस्टम्सने त्यांच्या ग्रुपविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांनी आपली पत्नी टिना अंबानी यांना गिफ्ट म्हणून खरेदी केलेली यॉट वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. टियान असं त्या यॉटचं नाव आहे. अनिल अंबानींच्या हेलिकॉप्टरमध्ये जाणूनबुजून बिघाड करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच कस्टम्स विभागामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.अनिल अंबानींच्या कंपनीनं परदेशातून आयात केलेल्या यॉटची कस्टम ड्युटी कंपनीने भरली नाही आहे. तसंच, त्यासाठी 15 कोटींची बँक गॅरेंटीही कंपनीनं आतापर्यंत तरी भरलेली नाही. त्यामुळे कस्टम्स विभागानं कोर्टात धाव घेतली आहे. त्याम कंपनीने कस्टम्स ऍक्टचा भंग केल्याचं कस्टम्स विभागाचं म्हणणं आहे. या केसवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टानं आज कंपनीला ऍफिडेव्हिट दाखल करायला सांगितलंय, तोपर्यंत याप्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.टियान नावची अंबानींची यॉट अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपच्या (एडीएजी) लाईट होल्डिंग्ज या कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात खरेदी केली होती. फेब्रुवारी महिन्यात कस्टम ड्युटी चुकवल्याचा ठपका ठेवून ती यॉट मुंबई कस्टम्सनं जप्त केली होती. मात्र एडीएजी ग्रुपने सदर यॉटबद्दल काहीही गैरप्रकार झाला नसल्याचं आज हायकोर्टात सांगीतलं आहे. एडीएजी ग्रुप याप्रकरणाबद्दल कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. दरम्यान आता गुरुवारपासून कोर्टाला उन्हाळी सुट्टी असल्याने या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे.

close