पवारांनी केलं विनय कोरेंचं समर्थन

May 8, 2009 4:54 PM0 commentsViews: 55

8 मे, साताराअपारंपरिक उर्जामंत्री विनय कोरेंना मंत्रिमंडळातून काढण्याची काँग्रेसची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धुडकावून लावली आहे. ते साता-यामध्ये बोलत होते. विनय कोरेंनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं समर्थन केलं होतं. त्यामुळे काँग्रेस त्यांच्यावर चिडली होती. 'सरकारची भूमिका मान्य नसेल तर अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी सरकारमधून बाहेर पडावं, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच दिला होता. लोकसभा निवडणुकीत कोरे यांनी काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचा आरो़प मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यावर आपण राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री झालो असल्यानं यावर शरद पवार योग्य निर्णय घेतील असं कोरेंनी म्हटलं होतं. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनय कोरे यांनी सरकारविरोधी कोणतंही काम न केल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सातारा इथे पत्रकार परिषदेत सांगितलं.

close