‘इबोला’व्हायरसमुळे भारत दक्ष, दिल्लीत हेल्पलाईन सुरू

August 9, 2014 7:10 PM0 commentsViews: 6870

eblo_delhi09 ऑगस्ट : जागतिक आरोग्य संघटनेने ‘इबोला’ व्हायरसची साथ पसरल्याचं जाहीर केल्यानंतर भारत या रोगाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय अधिकारी हाय अलर्टवर आहेत. भारताने दिल्लीत एक इमर्जन्सी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 011-23061469, 23063205 किंवा 23061302 हा नंबर हेल्पलाईन नंबर म्हणून जाहीर केलाय.

आजपासून मंगळुरू विमानतळावर येणार्‍या प्रत्येक प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या भारतामध्ये काळजीचं कारण नसल्याचं आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. पण तरीही खबरदारी म्हणून आरोग्य खातं कामाला लागलंय. नायजेरियाने इबोलामुळे देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर केलीय.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पश्चिम आफ्रिकेत इबोलाची साथ आली आहे, असं जाहीर केलंय. रोगाचा सामना करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये ही साथ पसरतेय त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदानं त्यांची मदत करावी, असं आवाहन WHO नं केलंय. इबोलाची साथ मार्च महिन्यात गिनीमध्ये सुरू झाली. त्यानंतर सिएरा लिऑन आणि लायबेरियामध्ये ही साथ पसरली. या रोगासाठी कुठलंही औषध किंवा लस नाही. आणि या रोगामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 50 टक्के आहे.

इबोलासाठी भारतात हेल्पलाईन
011-23061469
011-23063205
011-23061302
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close