रेगे-सिंघम रिटर्न्स एकत्र

August 9, 2014 8:45 PM0 commentsViews: 1290

09 ऑगस्ट : मराठी सिनेमा रेगे आणि हिंदी सिनेमा सिंघम रिटर्न्स टीम एकत्र येऊन मीडियाशी संवाद साधला. फिल्म इंडस्ट्रीत हे पहिल्यांदाच घडतंय. रेगे सिनेमाचा दिग्दर्शक अभिजीत पानसे, निर्माता रवी जाधव आणि सिंघम रिटर्न्सचा दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगण यांनी मिळून पत्रकार परिषद आयोजित केली होती. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी 15 ऑगस्टला रिलीज होत आहे. एरवी थिएटर्ससाठी स्पर्धा करणारे मराठी-हिंदी सिनेमांचे कलाकार, निर्माते एकाच वेळी एकाच ठिकाणी होते. अभिनेता महेश मांजरेकर यांची दोन्ही सिनेमांत भूमिका आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close