पुण्याला भेडसावतेय कच-याची तीव्र समस्या

May 8, 2009 5:20 PM0 commentsViews: 2

8 मे, पुणे पुण्यातला रिक्षाचा संप मिटतो न मिटतो तोच पुणेकरांसमोर एक नवी समस्या उभी राहिली आहे ती कचा-याची. कच-याच्या समस्येमुळे पुण्यातल्या आंदोलाने वेग पकडला आहे. पुण्याजवळच्या फुरसुंगी आणि उरळी देवाची इथल्या कचरा डेपोत येणार्‍या गाड्या परत पाठवून गावकर्‍यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यातच, या गावकर्‍यांनी कचरा डेपोच्या प्रश्नावरुन मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी कचर्‍याचा मोठा प्रश्न पुण्यात निर्माण झाला होता. पण तरीही प्रशासनाकडुन कोणताही उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावर तोडगा निघाला नाहीतर पुण्यात कचरा वाढणार आहे.

close