दुष्काळाचं अनुदान आघाडी सरकारने लाटलं -फडणवीस

August 9, 2014 9:28 PM0 commentsViews: 730

22dev_fadanvis09 ऑगस्ट : दुष्काळाचं अनुदान लाटण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीवर आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नीच्या खात्यात लाखो रुपयांचं अनुदान जमा झालेत असाही आरोप त्यांनी केला.

यानंतर, प्रशासकीय अधिकार्‍यांना फडणवीसांनी धमकीच दिली. सत्ताधारी हे फक्त दोन महिन्यांचे पाहुणे आहेत त्यानंतर गाठ आमच्याशी आहे असं ते म्हणाले. लातूरमध्ये भाजपचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.


 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close