‘अदलाबदलीला तयार पण 144 जागा मिळणार नाही’

August 9, 2014 10:30 PM0 commentsViews: 740

56manikrao_Thakare09 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीसाठी जागांच्या अदलाबदली करण्यास आम्ही तयार आहोत पण राष्ट्रवादीकडूनही असाच विचार झाला तरच आघाडीसाठी हे फायदाच राहिलं.

पण राष्ट्रवादीची 144 जागांची मागणी आम्हाला मान्य नाही असं पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. जागावाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांचे हायकमांडच घेतील असंही ठाकरे म्हणाले.

तर दुसरीकडे मागील विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आता राष्ट्रवादीला जास्त जागा मिळायला हव्यात, असं मत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मांडलंय. आयबीएन लोकमतला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली.

गेल्या वेळेस काँग्रेसचे जास्त खासदार होते, म्हणून त्यांना विधानसभेच्या जास्त जागा देण्यात आल्या. आता आमचे खासदार जास्त असताना आम्ही जास्त जागेची मागणी केली हे योग्य नाही का असा सवालही त्यांनी विचारलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close