प्रखर उन्हामुळे करपली जळगावची केळी

May 8, 2009 5:03 PM0 commentsViews: 2

8 मे, जळगाव कोरड्या हवामानाचा फटका उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावला मोठ्याप्रमाणावर बसत आहे. जळगावातल्या पिकांची प्रचंडü हानी झाली आहे. उष्णतेच्या कहरामुळे तिथल्या केळीच्या पिकानं करपायला सुरुवात केली आहे. केळी हे जळगाव जिल्ह्यातलं प्रमुख पीक आहे. करपा, मर, तुडतुड्या या केळीवर पडलेल्या रोगाच्या फटक्यातून अजूनही शेतकरी सावरला नाहीये. त्यात नदीला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, अक्षरश: कोरडा दुष्काळ जाणवायला लागला आहे. उष्णतेची ही लाट थांबली नाही तर तापमानाचा नवा उच्चांक किती नुकसान कारक ठरणार आहे, याची भीती शेतक-यांना आहे. उष्णतेच्या कहरामुळे जिल्ह्यातील सातशे गावांना पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे.

close