‘माळीण’वर नैसर्गिक संकट की मानवनिर्मित?

August 10, 2014 1:56 PM0 commentsViews: 1153

आरती कुलकर्णी, आयबीएन लोकमत

10  ऑगस्ट :  माळीणच्या दुर्घटनेला 10 दिवस उलटून गेलेत. या गावावर डोंगरकडा कोसळल्यानंतर माळीणच्या परिसरातली गावं आणि भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरात अशा संकटाची दहशत आहे. हे संकट नैसर्गिक आहे की आपण ओढवून घेतलेलं आहे. हा प्रश्न विचारला जातोय.

डोंगरकडा कोसळून अख्खं माळीण गाव गायब झालं. पण ही कहाणी एकट्या माळीणची नाही. माळीणच्या परिसरातली अनेक गावं डोंगर कोसळण्याच्या धास्तीनं रात्रंदिवस जीव मुठीत धरून जगतायत. माळीणच्या जवळच ओढ्याच्या पलीकडे आहे… असाणे गाव. माळीणसारखंच डोंगराच्या खालच्या बाजूला वसलेलं. या गावाच्या डोक्यावर असलेल्या डोंगरावर सरकारच्या पडकाई योजनेतून भातशेतीसाठी गाळे काढण्यात आलेत. इथले महादेव कोळी आदिवासी लोक डोंगरउतारावर पारंपरिक पद्धतीनं वर्षानुवर्ष शेती करायचे. पण आता मात्र भातशेतीच्या योजनेसाठी डोंगरात जेसीबी मशिन्स घुसवून अख्खा
डोंगर पोखरण्यात आलाय.

असाणे गावासारखाच सिद्धगडवाडी, तळामाची, साखरमाच, पांचाळे बुद्रुक अशा अनेक गावांनाही डोंगर कोसळण्याचा धोका आहे. माळीणच्या घटनेतून धडा घेऊन सरकारनं तातडीनं या गावकर्‍यांचं स्थलांतर करण्याची गरज आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close