देवेंद्र फडणवीसांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे- मुख्यमंत्री

August 10, 2014 5:54 PM0 commentsViews: 1699

Devendra and CM And ajit

10  ऑगस्ट :  भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.  गेल्या वर्षी काही कारणास्तव आपल्या खात्यात 3700 रुपये चुकून जमा झाले होते, तेही आपण लगेच परत केले, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचे आरोप उधळून लावले आहेत

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वार वाहू लागले आहेत. त्यासोबतचं अघाडी आणि विरोधीपक्षात आरोप- प्रत्यारोपांचा सिलसिलाही जोर धरू लागला आहे. ‘दुष्काळाचं अनुदान लाटण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीवर आहेत’, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांच्या खात्यात आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात लाखो रुपयांचं अनुदान जमा झालंय, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. त्याला उत्तर देत पृथ्वीराज जव्हाण यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, दुष्काळनिवारण निधीतून एकही पैसा माझ्या कुटुंबातल्या कोणीही घेतला नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणविसांचे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close