मुंबई वगळता राज्यभरातले पेट्रोलपंप आज बंद

August 11, 2014 9:55 AM0 commentsViews: 2055

Petrol

11 ऑगस्ट :  LBT आणि वाढीव टॅक्सच्या विरोधात पेट्रोलपंप चालक आणि मालक संघटनांनी आज पेट्रोल पंप बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई वगळता राज्यभरातले पेट्रोलपंप आज 24तास बंद राहणारेत. कोल्हापूर जिल्ह्यात आज 280 पेट्रोलपंप बंद आहेत. जिल्ह्यातली रोजची पेट्रोलची विक्री अडीच ते तीन लाख लिटर आहे. एकट्या कोल्हापुरात 50 लाख रुपयांची उलाढाल होते.

सरकारच्या LBT आणि वाढीव टॅक्समुळे ग्राहकांना दोन ते पाच रुपयांपर्यंत जादा दराने पेट्रोल- डिझेल खरेदी करावे लागते. वाढीव किमतीमुळे पेट्रोल डिझेलचा खप कमी झाल्याने पेट्रोलपंपांचा मालक धोक्यात आला असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. या पाश्‍र्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी सहापासून 24 तासांसाठी लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. आगामी काळात बेमुदत बंदचा इशाराही असोसिएशनतर्फे दिला आहे.

पेट्रोलपंप 24 तास बंद असणार आहेत.

कोल्हापूर- जिल्ह्यात 280 पेट्रोलपंप

  • कोल्हापूर शहरात 29 पेट्रोलपंप
  • जिल्ह्यातली रोजची पेट्रोलची विक्री सुमारे अडीच ते 3 लाख लिटर
  • जिल्ह्यातली रोजची डिझेलची विक्री सुमारे 5 ते6 लाख लिटर
  • रोजची सुमारे 50 लाख रुपयाची उलाढाल

नागपूर- जिल्ह्यात 240 पेट्रोलपंप

  • नागपूर शहरात 125 पेट्रोलपंप
  • रोजची पेट्रोलची विक्री जवळपास सुमारे 3 लाख 80 हजार लिटर
  • जिल्ह्यातली रोजची डिझेलची विक्री सुमारे 2 लाख लिटर
  • रोजची सुमारे सव्वा कोटी रुपयांची उलाढाल

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close