औरंगाबाद मध्यवर्ती बँकेचा कोट्यवधींचा गैरव्यवहार उघडकीस

May 8, 2009 5:15 PM0 commentsViews: 102

8 मे, औरंगाबाद औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. अदालत रोडवर असणा-या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मलकापूर अर्बन बँकेत दोन कोटी जमा करण्यात आले होते. या रकमेचा अपहार झाल्याची तक्रार सहकार खात्यात दाखल झाली आहे. सहकार खात्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एक कोटी रूपयांची रोख रक्कम मलकापूर अर्बन बँकेत का जमा करण्यात आली होती, याचं कारण मात्र कळू शकलेलं नाहीये. याच औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पैठण तालुक्यात नारळाच्या शाखेतून बँक इन्स्पेक्टर बी.एन.घोरपडे यांनी साडे तीन लाख रूपयांचा अपहार केल्याचंही सहकार खात्याच्या चौकशीत उघड झालं आहे. या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही सहकार खात्यानं दिलेले आहेत, अशी माहिती सहकारी बँकेचे विभागीय सहनिबंधक डॉ. सुभाष माने यांनी दिली आहे. आधीच नोकरभरती सारख्या निरनिराळ्या घोटाळ्यांच्या प्रकरणांनी गाजलेली ही बँक संस्थेचे माजी अध्यक्ष रामकृष्णबाबा पाटील यांच्या काळातही गाजली होती. अनेक गंभीर तक्रारी तेव्हा या सहकार खात्याकडे आल्या होत्या. आता तर या नवीन प्रकरणी चौकशी अहवालानंतर संचालक मंडळावही कारवाई होऊ शकते.

close