स्मृती इराणींकडे येल विद्यापीठाची पदवी

August 11, 2014 10:24 AM0 commentsViews: 1929

smriti-irani_2_0_0

मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शिक्षणावरून सुरू असलेल्या वादाला नवं वळण मिळालंय. शनिवारी एका कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी त्यांच्याकडे येल विद्यापीठाची डिग्री असल्याचं स्पष्ट केलं. पण त्यांनी ही डिग्री नेमकी कोणत्या विषयात आहे, हे स्पष्ट केलं नाही. गेल्या वर्षी 11 भारतीय खासदारांची येल विद्यापीठाच्या लीडरशीप कोर्ससाठी निवड झाली होती. त्यामध्ये स्मृती इराणींचा समावेश होता.

आठ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा कोर्स आतापर्यंत 80 खासदारांनी केलाय. त्यांना निवडणुकीच्या वेळच्या वादासंदर्भात विचारल्यावर त्यांनी पत्रकारांना खरी-खोटी माहिती काढण्यासाठी याचिका दाखल करण्याचं आव्हानही दिलं. ‘जे लोक मला अशिक्षित म्हणतात, त्यांच्यासाठी माझ्याकडे येल विद्यापीठाची पदवी आहे. मी हे दाखवू शकते की येलनं माझ्यातल्या नेतृत्वक्षमतेचा कसा गौरव केला’ असंही त्या म्हणाल्या

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close