पंजाब किंग्ज एलेव्हनची डेक्कन चार्जर्सशी आमने सामने तर

May 9, 2009 11:22 AM0 commentsViews: 3

9 मे, आयपीएल सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी पंजाब किंग्ज एलेव्हनला आजची मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. किंग्ज एलेव्हनचा फास्ट बॉलर ब्रेट ली आता टीममध्ये परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे युवराज सिंगसाठी ही जमेची बाजू ठरणार आहे. पण दुसरीकडे डेक्कन चार्जर्सचा ऍण्ड्र्यु सायमंड्सही टीममध्ये परतला आहे. अशा वेळी आजच्या मॅचमध्ये कोणते 4 परदेशी खेळाडू खेळतील हा महत्त्वाचा निर्णय कॅप्टन गिल ख्रिस्टला घ्यावा लागणार आहे. दोन्ही टीम स्पर्धेत पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध खेळणार आहेत. त्यामुळे आज कोणती टीम वरचढ ठरतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर आयपीएलमध्ये राजस्थान आणि चेन्नईची टीम यापूर्वी चार वेळा आमनेसामने आली आहे. यातल्या तीन मॅच राजस्थानने जिंकल्या आहेत. मात्र आयपीएलच्या या सिझनमध्ये झालेली मॅच चेन्नईने आरामात जिंकली आहे. दोन्ही टीम्सची यंदा स्पर्धेतली सुरुवात जरा सावकाशच झाली होती. पण हळूहळू दोन्ही टीम्सनी जोर पकडला आहे. चेन्नईने शेवटच्या सलग चार मॅच जिंकल्यात तर राजस्थानने तीनदा विजय मिळवलाय. पॉइंट टेबलमध्येही दोन्ही टीम्स पहिल्या 4 मध्ये आहेत. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये या इन फॉर्म टीम्समधला मुकाबला कसा रंगतो हे पाहयला हवं.

close