अरे देवा ; ‘साईबाबा देव आहेत की नाही ? यासाठी धर्मसंसद भरणार !

August 11, 2014 11:06 PM1 commentViews: 2935

shankaracharya_11 ऑगस्ट : शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीच असं विधान करुन द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी वाद निर्माण केला. पण हा वाद अजूनही काही थांबलेला नाही. आता तर साईबाबा हे देव आहेत की नाही यावर धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

येत्या 24 तारखेला छत्तीसगढ मधील कवधडा इथं धर्मसंसद आयोजित करण्यात आली आहे. साईं संस्थानने आपली बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण घेऊन शंकराचार्याचे प्रतिनिधी शिर्डीला गेले होते.

साई संस्थानला दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केला आहे. समितीच्या समोर हा विषय ठेवून निर्णय घेणार असल्याच संस्थानने स्पष्ट केलं आहे.

आता धर्म संसद ठरवणार साईबाबा देव आहे की संत त्यांची. आणि जर देव असतील तर पूजा करायची की नाही. हिंदुनी मंदिरात जायचे की नाही यावर या संसदेत मंथन होणार असल्याचं कळतंय.

स्वामी स्वरूपानंद यांनी साईबाबांबद्दल विधान केल्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्यांच्याविरोधात साईभक्तांनी गुन्हाही दाखल केलाय. पण आता त्यांच्याच विधानाची शहानिशा करण्यासाठी धर्मसंसदच भरवण्यात येणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • face book

    Om sai

close