मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची क्रीडा मंत्रालयाची शिफारस

August 12, 2014 2:25 PM0 commentsViews: 350

Dhyanchand1936semifinal copy

12  ऑगस्ट : हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत मेजर ध्यानचंद यांची भारतरत्नसाठी क्रीडा मंत्रालयाने गृहमंत्रालयाकडे शिफारस केली आहे. आज केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी लोकसभेत यासंदर्भातील माहिती दिली. मोदी सरकारने यंदा तब्बल पाच जणांना भारतरत्न देण्याची तयारी सुरु केली आहे.

हॉकीत भारताला तब्बल तीन वेळा गोल्ड मेडल मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. गेल्यावर्षी सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर झाल्यावरही ध्यानचंद यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. ध्यानचंदना भारतरत्न देण्याची मागणी विविध स्तरातून होतं आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालय काय नेमका निर्णय घेतंय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मेजर ध्यानचंद यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला हॉकीमध्ये 3 गोल्ड मेडल दिला होता.

ध्यानचंद यांचा जीवनप्रवास

  • जन्म – 29 ऑगस्ट 1905, अलाहाबाद
  • 1928,1932,1936 अश्या सलग तीन ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघात
  • ऑलपिंक सुवर्णपदकात महत्वाचा वाटा
  • इंटरनॅशलन करिअरमध्ये 400 हून जास्त गोल
  • 16 व्या वर्षी इंडियन आर्मीत प्रवेश
  • त्यांच्या अप्रतिम खेळासाठी त्यांना द विझार्ड मेजर ध्यान चंद असंही ओळखले जाते
  • 1948 ला खेळले शेवटचा इंटरनॅशनल हॉकी सामना

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close