‘मोदी सरकार आल्यापासून जातीय हिंसाचाराच्या घटना वाढल्या’

August 12, 2014 4:23 PM0 commentsViews: 932

32sonia_on_modi12 ऑगस्ट : जातीय हिंसाचारविरोधी विधेयकावर संसदेत चर्चा होण्याआधीच सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचाराच्या घटना वाढल्याचा आरोप यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी केलाय.

मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे समाजविघातक कारवायांना चालना मिळालीये. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात अशा घटनांनी डोकंवर काढलं याचा उल्लेखही सोनियांनी केला.

सोनिया गांधी आज केरळ दौर्‍यावर आहेत. तिरुअनंतपुरममध्ये झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close