पवारांची मोर्चेबांधणी सुरू : उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

May 11, 2009 6:58 AM0 commentsViews: 3

11 मे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. 16 तारखेला होणार्‍या मतमोजणीनंतर मोर्चेबांधणीसाठी शरद पवार यांनी उद्धव यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला, असं सूत्रांनी म्हटलंय. पवार सध्या मुंबईत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान 13 तारखेला होतंय. जनतेचा कौल स्पष्ट झाल्यानंतर संभाव्य राजकीय समीकरणांची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. चौथ्या टप्प्यातल्या मतदानानंतर युपीएला एनडीएपेक्षा कमी जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आता एनडीएचे काही घटकपक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

close